गुजरातेत आमिर खान च्या फ़ना वर बंदी आणल्यामुळे तिथल्या लोकंना मुंबईला येऊन या चित्रपट बघावा लागत आहे. नर्मदा धरणा प्रकरणी आमिर खान ने शासनाची विरुद्ध पवित्रा घेतल्याने गुजरातच्या भा.ज.प युवा कार्यकर्त्यां मध्ये गेले काही दिवस तणाव निर्माण झाला होता. स्थितिचा अंदाज घेऊन गुजरात सरकार ने या चित्रपटाच्या स्क्रीनिंग वर आळ आणला आहे. परंतु ही बाब तिथल्या रसीक युवकांना रोखून धरण्यास अपुरी ठरली. रविवार सकाळी ५:३० वाजता मुंबई च्या सेंट्रल स्टेशन वर चार गुजराती युवक गुजरात एक्सप्रेस मधून उतरले. आणि आपल्या राज्याच्या शासकीय बहिष्काराची काळजी न करता त्यांनी "फ़ना" पाहिला.
ही बातमी ऎकून मला अतिशय आनंद झाला. अशा बेकार शासकीय बहिष्कारांचा निषेध हा झालाच पाहिजे. या ४ युवकांच्या धाडसी क्रुत्याने आणखीन एकदा सरकारला लोकांच्या भावनांची भातुकली मांडण्यापासून निश्चितच पराव्रुत्तं केलंय. भारतात गेली अनेक वर्षं नेते विविध प्रकारे लोकांसमोर आपली image create करण्यासाठी धडपड करत आहेत. पण आपण त्यांच्या या क्ल्रुप्त्यांना कितपत बळी पडावं आणि कितपत त्यामुळे आपल्या जीवन शैलीत बदल घडू द्यावा ह्याचा निर्णय आपणच घ्यायला हवा. नाही का?
तिथेच महाराष्ट्रात अनेक शहरात व गावांत फ़ना लाखो लोकांनी एकाच वेळी आणि तो देखिल first day first show पाहिला. कसा? ते वाचा आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये.